77व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ

समालखा, 7 ऑक्टोबर, 2024:- या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात.  त्यांची भाषा, वेशभूषा, आहार, जात, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहे. या सगळ्या विभिन्नता असूनही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आपण सर्व मनुष्य आहोत. आपला वर्ण कोणताही असो, वेशभूषा कशीही असो, देश कोणताही असो किंवा खाणे-पिणे कसेही असो; सर्वांच्या धमण्यांमध्ये एकसारखेच रक्त वाहत […]

Continue Reading

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा प्रस्तावित पालघर जिल्हा दौरा

पालघर दि. 3 (जिमाका) : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे दि. 7 ऑक्टोबर रोजी जव्हार येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरीक, उद्योगपती, पत्रकार, खासदार, माजी खासदार, आमदार, जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी तसेच राजकीय पक्षाचे नेते आणि विविध शिष्ठमंडळ यांच्याशी शासकीय विश्रामगृह, जव्हार येथे संवाद साधणार आहेत.

Continue Reading

जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई, द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार,  पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान आकाश पूर्णपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे कमाल व किमान तापमानात घट व आर्द्रतेत वाढ होईल […]

Continue Reading
कोकणातील केळशी गावांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

कोकणातील केळशी गावांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

गणेशोत्सव आणि कोकण यांचं एक अतूट नातं आहे. कामानिमित्त बाहेरगावी  असणारे सर्व चाकरमानी गणेश उत्सवानिमित्त आपल्या घरी जाऊन आवर्जून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. कोकणातल्या या पारंपारिक उत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी गावात अनोखा सोहळा अनुभवास येतो. गणपती आगमनापासून ते गणपती विसर्जनापर्यंत विविध प्रथा परंपरा याचा अनोखा संगम  गावामध्ये दिसून येतो. केळशी या गावांमध्ये […]

Continue Reading

पालघर जिल्ह्यामध्ये 1851 मुख्यमंत्री योजनादूताची नियुक्ती होणार’ या उपक्रमासाठी अर्ज सादर करावे – राहुल भालेराव

पालघर दि. 8 : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी    पालघर जिल्ह्यामध्ये 1851 मुख्यमंत्री योजनादूताची नियुक्ती होणार   आहे . हा  उपक्रम सुरु करण्यात आला असून. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले . जिल्ह्यातील उमेदवारांना […]

Continue Reading

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयाण

पालघर, दि. 30 (जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस परेड मैदान हेलिपॅड , पालघर येथून प्रयाण झाले. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित […]

Continue Reading
३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आज उमरगाव बंद

३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आज उमरगाव बंद

गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव येथील गांधीवाडीत एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात परप्रांतीय आरोपीच्या मुसक्या आवळण्यात उमरगाव पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत असून या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, म्हणून आज सम्पूर्ण उमरगाव शहरात अनेक सामाजिक संघटने कडून […]

Continue Reading
पालघर जिल्हातील शिक्षकांचा राज्यस्तरीय प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देवून सन्मान

पालघर जिल्हातील  शिक्षकांचा राज्यस्तरीय प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देवून सन्मान

शिक्षण, साहीत्य व कला क्षेत्रात कार्यरत व्यक्तीमत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभरातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रस्ताव मागवले होते. यात पालघर जिल्हातील योगेश गोतारणे, गातेस बु, वाडा यांना उत्कृष्ट निवेदक राज्यस्तरीय अमृत गौरव पुरस्कार, संदीप पाटील, पालघर यांना आदर्श शिक्षक अमृत गौरव पुरस्कार व रूचिरा राजेश राऊत […]

Continue Reading
डहाणूत मालिका कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव रंगणार!

डहाणूत मालिका कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव रंगणार!

दहीहंडी उत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डहाणूतील मिशन अन्नपुर्णा ऑफीस, ओमकार दर्शनच्या बाजुला, मसोली या ठिकाणी आयोजक मुक्तेश शशिकांत डफरीया यांच्या वतीने करण्यात आला आहे.या दहीहंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी उत्सव दरवर्षी टीव्ही कलाकारांना बोलावून साजरा करतात. यावर्षी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे कलाकार […]

Continue Reading

जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ सप्टेंबर रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. त्या अनुषंगाने  सप्टेंबर २०२४ चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन  सोमवार, दि. ०२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी अर्ज केलेल्या नागरिकांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह प्रत्यक्ष वरील दिनांकास व वेळेवर उपस्थित रहावे.

Continue Reading