भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई, द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान आकाश पूर्णपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे कमाल व किमान तापमानात घट व आर्द्रतेत वाढ होईल कमाल तापमान २७ ते ३० अं से. व किमान तापमान २२ ते २५ अं से. राहण्याचा अंदाज आहे. वीजांचा कडकडाट, मेघ गर्जना होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवानी आपल्या मोबाईल मध्ये “दामिनी” अॅप्लिकेशन वापरुन आपली व आपल्या जनावरांची सुरक्षा करावी, अशी माहिती जिल्हा कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांनी दिली पालघर तर्फे देण्यात आली आहे.
विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने शेतकरी बांधवांनी खते देणे व फवारणीची कामे पुढे ढकलावीत. फळबागेत व भाजीपाला शेतातील जास्तीचे पाणी साचू नये म्हणून निचरा होण्याची व्यवस्था करावी. असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.
|
|

