शिक्षण, साहीत्य व कला क्षेत्रात कार्यरत व्यक्तीमत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभरातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रस्ताव मागवले होते. यात पालघर जिल्हातील योगेश गोतारणे, गातेस बु, वाडा यांना उत्कृष्ट निवेदक राज्यस्तरीय अमृत गौरव पुरस्कार, संदीप पाटील, पालघर यांना आदर्श शिक्षक अमृत गौरव पुरस्कार व रूचिरा राजेश राऊत , डहाणू यांना साहीत्य सेवा अमृत गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. बांद्रा, मुंबई येथील नॅशनल लायब्ररी सभागृहात पार पडलेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात राज्यातील शिक्षण व साहीत्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब तोरस्कर, उद्धाटक डॉ. म. रा. माळवे व स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुळावले होते. तसेच पद्मश्री प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव, डॉ. डेरीक ऐंजल, नासा शास्त्रज्ञ, सकृत खांडेकर पत्रकार अशी दिग्गज व्यक्तीमत्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालघर जिल्हातील या तीनही शिक्षकांच्या शैक्षणिक व साहीत्यिक कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली व पालघर जिल्हाचे प्रतिनिधीत्व केले यासाठी या तिनही शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
|
|

