चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी संचलित मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालय, चिंचणी या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरकार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व महाविद्यालयाचे माजी पर्यवेक्षक संजय घरत हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपले आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी रानभाजीचा समावेश आपल्या आहारात असावा असे मार्गदर्शन केले. के डी. हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश रावते सरांनी रानभाजी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुचिरा राऊत यांनी केले मान्यवरांचे परिचय सुनिता शितोळे यांनी केला आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुशीला भोणे- बहारे यांनी केले.
आजूबाजूला असणाऱ्या परिसरातील जवळजवळ 30 रानभाज्या आणि त्यांच्या पाककृती विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणल्या विद्यार्थ्यांना रानभाजी चे महत्व कळावे आणि सगळ्यांनी रानभाज्यांचा आहारात समावेश करावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

