महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यास लाच घेताना रंगेहात पकडले 

Daily News
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री अतुल अशोक आव्हाड वै 42 आशागड शाखा डहाणू उपविभाग   पालघर विभाग यांना आज स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांचा म्हशीचा तबेला असून सदर तबेलाच्या वीज मीटर व्यतिरिक्त सर्विस केबल मधून डायरेक्ट कनेक्शन करून तक्रारदार यांनी वीज चोरी केली असल्याचा त्यांच्या आरोप करून दंडात्मक कारवाईसाठी रुपये सात लक्ष आकारण्यात आले सदर दंडात्मक कारवाईंना करण्यासाठी लोकसेवक श्री अतुल अशोक आवड कनिष्ठ अभियंता यांनी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती याबाबतचा तक्रार अर्ज दिनांक वीस तीन 2025 रोजी पालघर येथील लाज प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाला होता त्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली पैकी तीन लाख रुपयांची काचेची मागणी या रकमेपैकी दोन लाख रुपये रक्कम स्वीकारताना संबंधित कनिष्ठ अभियंता यांना रंगेहात पकडण्यात आली आहे या बाबत पोलीस निरीक्षक शिरीष प चौधरी लाच प्रतिबंधक विभाग पालघर यांनी सापळा लावून संबंधित कनिष्ठ अभियंता यांना पकडून अटक केली या सापळा पथकामध्ये पोलीस उपाधीक्षक हर्षल चव्हाण पोलीस हवालदार नवनाथ भगत पोलीस हवालदार योगेश धारणे पोलीस हवालदार विलास भोये पोलीस हवालदार दीपक सुमडा पोलीस अधिकारी आकाश लोहारे व जितेंद्र गवळी यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *