डहाणूत हवामानासह राजकीय वातावरणही तापणार

Daily News
हवामान खात्याकडून १२ जानेवारी रोजी हलक्या पावसासह वाऱ्याचा इशारा देण्यात आला असून, परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या सरींसह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दुसरीकडे १३ जानेवारी रोजी डहाणू नगरपरिषदेत राजकीय वावटळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध गटांमध्ये जोरदार हालचाल सुरू आहे.
हवामानात बदल आणि त्याचवेळी नगरपरिषदेत राजकीय वादळ अशा दुहेरी घडामोडींमुळे डहाणू शहराचे लक्ष आता येत्या दोन दिवसांकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *