वाणगाव उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे ?

Daily News
डहाणू दि. २५ : पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्थानकाअंतर्गत येणाऱ्या पूर्व आणि पश्चिमेला जोडले
गेलेल्या फाटकावरील उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. अर्थात या उड्डाण पुलाचे उद्घाटनवजा
लोकार्पण होणार होते. तद्वत वाहतुक सुरु होण्यापुर्वीच पुलाच्या दर्शनीवरच्या भागावर मोठ्या भेगा पडल्या गेल्या आहेत. त्यामुळे उड्डाण पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे तर नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाणगाव रेल्वे स्थानकातील जागेत पाच वर्षापासून सुरु असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पूर्ण केले गेले. ५७ कोटी खर्चाच्या पुलाचे बांधकाम ‘टीएनटी’ कन्स्ट्रक्शन या कंपनीने पूर्ण केले.
परंतू वाहतुक सुरु होण्याआधीच महिनाभरापुर्वी पुलाचे बांधकाम आणि त्यावरील पृष्ठभागावर डांबरीकरण केले गेले खरे, पण पंधरा दिवसानंतर हा पुल खुला केला जाण्याच्या आधीच पुलावर मोठमोठ्या भेगा पडल्याने बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *