डहाणू इराणीरोड या रोडवर असलेल्या गटारीच्या पाईपलाईन भरुन गेले असताना घाणीचे पाणी रोडवर पसरलेल्याची समस्या बरेच महिन्यापासून आहे. तर हे पाईप लाईन दुरुस्ती करावी अथवा नवीन पाईपलाईन बसवायची गरज आहे. या परिसरातील रहिवासी नागरीकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. असे निवेदन डहाणू चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डहाणू सेक्रेटरी दिलीप सी. शाह यांनी डहाणू नगरपरिषदेस दिलेले आहे. तत्कालीक हे दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

