डहाणू मधील प्रतिष्ठित जनता सहकारी बँक निवडणूक प्रक्रिया काही दिवसातच घेतली जाणार आहे. संबंधित कार्यकारणीचा कार्यकाळ लवकरात लवकर संपुष्टात येणार असल्याने
डहाणू जनता बँकेची निवडणूक लागली असून राजकीय तयारी जोरदार सुरु झाली असून गेल्या टर्ममध्ये स्वर्गवासी राजेश पारेख यांनी राजकीय दिमाख लावून जनता बैंक काबीज केली होती. परंतू आज स्व. राजेश पारेखची कमी दिसून येत आहे. तर स्व. राजेश पारेख यांची जागा कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर मिहिर शाह यांनी माघार घेतली तर या पॅनलला पुन्हा निवडून यायला तारेवरची कसरत करायला लागणार. तर दुसरी बाजू श्री भरतभाई राजपूत हे राजकीय डाव वेळेवर कसा फिरवायचा त्यात ते माहिर आहेत. राजपूत हे यावेळी त्यांच्या पॅनलमध्ये बरेच चेहरे बदलणार आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
एकंदरीत डहाणू रोड जनता बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसातच डहाणूकारांना दिसून येणार आहे
|
|

