यारी दोस्ती ग्रुप सदस्याने रक्तदान करून जपले माणुसकीचे नाते

यारी दोस्ती ग्रुप सदस्याने रक्तदान करून जपले माणुसकीचे नाते 

Daily News
डहाणू दि.८ : दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी, डहाणु तालुक्यातील जांबुगाव नागबन येथील ज्योती वंजारा वय २३ वर्ष या उपचारासाठी  डहाणु सरकारी दवाखान्यात ऍडमिट आहेत. या दरम्यान त्यांना B positive रक्ताची नितांत आवश्यकता भासत होती. सदर रक्त त्यांना कुठेही उपलब्ध होत नव्हते यासाठी त्यांना डोनर पाहिजे होता. इतरत्र चौकशी करत असताना त्यांनी यारी दोस्ती ग्रुप सदस्यांशी संपर्क करून डोनर ची मागणी केली असता ग्रुप मधील सदस्य अशोक भुयाल (वानगाव) रुग्णासाठी डहाणु रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले.
आज रक्ताची वाढणारी मागणी आणि अपुरा रक्त पुरवठा यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका सुद्धा होऊ शकतो,असा वेळेस ग्रुप मधील सदस्य तत्काळ रक्ताची आवश्यकता असताना कधीही निस्वार्थ भावनेने रक्त देण्यास तयार असतात माणुसकीच्या नात्याने सामाजिक कर्तव्य म्हणून यारी दोस्ती ग्रुप मधील सदस्य एका मेसेजवर बहुमोलाचे असे रक्तदान करण्यासाठी तयार होतात.हेच खूप महान आणि मोलाचे कार्य आहे. यारी दोस्ती ग्रुप आपल्या सर्व पालघर मधील युवा तरुण मित्रांना आवाहन करतो की अशा प्रकारचे समाजकार्य करण्याची आवड निर्माण करा आणि त्यासाठी एकत्र येवून यारी दोस्ती ग्रुप मध्ये सामिल होवून आपण सर्व मिळून गरजुंसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *