कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महावि‌द्यालयात महसुल पंधरवडा संपन्न

कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महावि‌द्यालयात महसुल पंधरवडा संपन्न*

Daily News
तलासरी : आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महावि‌द्यालय तलासरी येथे महसूल  विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना, (NSS) विभागामार्फत  महसुल पंधरवडा निमित्त युवा संवाद मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रारंभ गोदूताई परुळेकर यांचा प्रतिमा पूजनाने आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री कुमार कुठारे,मंडळ अधिकारी,
तलासरी यांनी केले. भविष्यातील स्पर्धा परीक्षा तसेच विविध योजना बद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणी कशी करावी आणि त्यासाठी फॉर्म नंबर ६ चे वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाचे उप-प्रचार्य डॉ रावसाहेब पवार  यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना
मतदानाबद्दल जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रा.भास्कर गोतीस यांनी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर ६ कसा भरावयाचा त्याचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवले आणि
येणाऱ्या त्रुटी  दूर करण्यासाठी मदतीचे आश्वासन सुद्धा देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून महसूल विभागाचे श्री नितीन हारड , नायब तहसीलदार तलासरी हे उपस्थित होते. त्यांनी स्पर्धा परीक्षा बद्दल खूप मोलाचं  मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच सोशल मिडिया वापरावरील वेळेची बचत करून तो वेळ आपले भवितव्य घडवण्यासाठी करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. आपल्या भागातील  युवकांनी कसं घडावं व स्पर्धा परीक्षेतून काहीतरी साध्य करावं यासाठी परिस्थितीवर मात कशी करता येईल याबद्दलही त्यांनी स्वतःचा अनुभव सांगून वि‌द्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमासाठी महसूल विभागाचे श्री लहानु माहला तलाठी तलासरी,श्री कोटेवार लिपिक तहसील कार्यालय तसेच महावि‌द्यालयातील प्रा. महेश माळवदकर, ग्रंथपाल डॉ. अर्जुन होन, प्रा.दिपक वाकडे, प्रा.तायडे,
प्रा अमोल दबडे आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचारी  यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे २५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश साळवे  तसेच आभार प्रदर्शन प्रा. शेफाली गहला यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *