मानधन तत्वावरील ८२१ शिक्षकांचे नियुक्ती आदेश वाटप

मानधन  तत्वावरील ८२१ शिक्षकांचे नियुक्ती आदेश वाटप

Daily News
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील शिक्षक या संवर्गाची ५ ऑक्टोबर २०२४ च्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर मानधन तत्वावरील नियुक्त शिक्षकांना आज जिल्हा परिषद पालघर येथे नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हे आदेश देण्यात आले असून सदर शिक्षक आज नेमून दिलेल्या शाळेवर हजर झाले.
मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या अंतिम निर्णयास अधीन राहून हे आदेश देण्यात आले.गेल्या वर्षभापासून प्रलंबित असलेली ही शिक्षक भरती ची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सर्व समिती सभापती यांच्या नियमित पाठपुराव्यामुळे ही मानधन तत्वावरील भरती प्रक्रिया यशस्वी झाली आहे. या भरती मुळे जिल्ह्यातील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात भरून निघाली असून  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी याचा निश्चितच फायदा होईल.तसेच शासनाचे मार्गदर्शन प्राप्त करून घेऊन   पेसा व अन्य प्रवर्गातील पात्र उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावरील शिक्षक भरती  देखील लवकर केली जाईल असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी यावेळी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती पंकज कोरे यांनी शिक्षकांचे अभिनंदन करून नेमून दिलेल्या शाळेवर प्रामाणिक पणे काम करा, प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *