दै. ‘डहाणू मित्र’चा दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Daily News

डहाणू दि. 25 : संपूर्ण पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या कानाकोपर्‍यात वाचला जाणार्‍या डहाणू येथून प्रकाशित होणार्‍या दैनिक ‘डहाणू मित्र’चा दहावा वर्धापनदिन कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यांत आला.
दैनिक ‘डहाणू मित्र’ला 25 डिसेंबर रोजी 10 वर्ष पूर्ण होऊन 11 व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त डहाणूतील जनार्दन आर्केडमधील ‘डहाणू मित्र’च्या कार्यालयात लहान मुलगी पृथा दळवी हिच्या हस्ते केक कापून ’डहाणू मित्र’चा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यांत आला. निर्भीड निपक्ष बातम्या देणारे एकमेव वर्तमानपत्र म्हणून ख्याती असलेले दैनिक डहाणू मित्र अतिशय कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झाले आहे. खेडोपाड्यातील बातम्या पासून ते अगदी आंतरराष्ट्रीय बातम्यांपर्यंतचा ओघ हे दैनिक डहाणू मित्रचे वैशिष्ट्य आहे. बातमी संकलन आणि संपादन याबाबतीमध्ये पत्रकार रफिक घाची यांचेही नाव डहाणूत अग्रस्थानी आहे. दैनिक डहाणू मित्र चा सर्व कार्यालयीन कर्मचारी विभाग यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरी हेच डहाणू मित्र या दैनिकाचे यश मानले जाते.
गेल्या 10 वर्षात आमचे प्रिय वाचक, जाहिरातदार, हितचिंतक तसेच ज्ञात-अज्ञात महानुभवांचा आशिर्वाद, प्रेम आणि सहकार्य जे लाभत आले, त्याबद्दल त्यांचे आभार मानत ऋणी असल्याचे, यावेळी बोलताना संपादक रफिक घाची यांनी सांगितले. यावेळी कार्यालयीन सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *