परतीच्या पावसाचा इशारा 

Daily News
पुढील २-३ दिवसात उत्तर महाराष्ट्रातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवली आहे. त्यामुळे ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबत कमाल व किमान तापमान २-३ अंश सेल्सियस ने वाढ होवून  कमाल तापमान ३३ ते ३४ अं. से. आणि किमान तापमान २५ ते २६ अं. से. राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळेस साधारत: अंशत ढगाळ वातावरण राहील व वाऱ्याची गती ५ ते ७ किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान तज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.
पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी भात कापणीस तयार असेल तरी कापणी दोन दिवस पुढे ढकलावी. कापणी केलेली असेल तर गोळा  करून सुरक्षित कोरड्या ठिकाणी ठेवावे जेणेकरून पावसामुळे भिजणार नाही. भात पीक दाणे भरणे अवस्थेत असताना कापणीपूर्वी ८-१० दिवस अगोदर खाचरातील पाणी बाहेर काढून टाकावे. हालक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता असल्याने, फवारणी केल्यानंतर औषध पिकावरून वाहून जाण्याची शक्यता असते त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी फवारणीची कामे उघडीप पाहून करावीत, किंवा औषधामध्ये स्टीकरचा वापर करून फवारणी करावी. मागील काही दिवसापासून मच्छीमार बांधव मासळी सुकविण्यासाठी बाहेर ठेवत असतील तर त्यांनी सुद्धा पुढील दोन दिवस मासे सुकविण्यासाठी ठेवू नये. असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *