गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव येथील गांधीवाडीत एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात परप्रांतीय आरोपीच्या मुसक्या आवळण्यात उमरगाव पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत असून या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, म्हणून आज सम्पूर्ण उमरगाव शहरात अनेक सामाजिक संघटने कडून बंद पुकारण्यात आले आहे. शहरात तणावाच्या वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आले आहे. दरम्यान कुठलाही प्रकारची अफवावर विश्वास ठेवू नका असे आव्हान उमरगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे तसेच आरोपीच्या विरोधात सक्त कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उमरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिले आहे.

