तलासरी दि.३०
शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा शाळेत गेल्या२५वर्षांपासून शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या दत्तात्रय शिंदे यांनी नुकतीच आपल्या सेवेची २५वर्षे पूर्ण केल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.शाल, श्रीफळ, मानपत्र, भेटवस्तू व चषक असे सत्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाचालक फादर निलम लोपीस, माजी मुख्याध्यापक रामचंद्र राबडसर तर अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक संतोष पागी सर तसेच शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका मीना मॅडम, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर थेल्मा,मुख्याध्यापक सचिन जीवडे, मुख्याध्यापक रमेश नागुडे, सहशिक्षक अजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आली. मुख्याध्यापिका मीना मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पदवीधर शिक्षक शिकंदर ठाकरे यांनी पाहुण्यांची ओळख व स्वागत केले. संस्थाचालक फादर निलम लोपीस यांनी सरांच्या कार्याचा गौरव करत पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या. यशवंत थापड सरांनी आपल्या मनोगतातून शिंदे सरांसोबतचे प्रेरणादायी प्रसंग कथित केले.माजी मुख्याध्यापक राबड सरांनी सरांसोबतचे प्रेरक प्रसंग व्यक्त करत पुढील सेवाकार्याला शुभेच्छा दिल्या.तर अध्यक्ष माजी मुख्याध्यापक संतोष पागी सरांनी शिंदे सरांच्या२५ वर्षाच्या सेवाकार्यावर आधारित स्वरचित कविता सुंदर चालीसह सादर करत अनोख्या शुभेच्छा दिल्या. शिंदे सरांनी आपल्या मनोगतात आपल्या जीवनातील मोजके प्रेरक प्रसंग सांगत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक वैभव सर , प्रणव सर तसेच सुशील सर यांनी आकर्षक व्हिडीओ तसेच पी पी टी द्वारे शिंदे सरांच्या २५ वर्षातील सेवा कार्याची ओळख करून दिली. मनीषा वरखंडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे सूत्रसंचालन सुभाष वसावला यांनी केले.आपल्या २५ वर्षे सेवापूर्तीचे औचित्य साधून शिंदे सरांनी शाळेच्या वाचनालयास २५ शैक्षणिक पुस्तके भेट स्वरूपात दिली.

