डहाणू मित्र दिवाळी अंकाला राज्यस्तरीय पुरस्कार

दिवाळी अंक स्पर्धा २०२५ मध्ये दैनिक “डहाणू मित्र”ला उत्कृष्ट अंक पुरस्कार!

Daily News
पुणे मुंबई जुन्या हायवेलगत श्रीकृष्ण पॅलेस, सुदामा हॉल येथे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे वर्धापन दिनानिमित्त पी सी एम सी टॉप १० तसेच राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२५ च्या पुरस्कारांचे वितरण दिनांक 12 मार्च 2026 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड चे महापौर रवी लांडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, विचारवंत हेमंत देसाई आणि उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह पिंपरी चिंचवड भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर, तसेच  विविध समित्यांचे सभापती याप्रसंगी मंचावर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर पी सी एम सी टॉप टेन यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर दिवाळी अंक २०२५ च्या स्पर्धेत विविध अंकांची नावे जाहीर करण्यात आली. दिवाळी अंक स्पर्धा २०२५ मध्ये दैनिक डहाणू मित्र च्या विचारलें ला उत्कृष्ट अंक पुरस्कार मिळाला. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह संपादक रफिक घाची  यांच्या वतीने व्हिडिओ जर्नालिस्ट सौ.माधुरी बाबू डिसोजा कुमठेकर यांनी स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *