क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये कार्निव्हल उत्सव साजरा!

क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये कार्निव्हल उत्सव साजरा!

Daily News

क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रंगा-रंगी आणि आनंदाने भरलेला कार्निव्हल उत्सव साजरा करण्यात आला. डहाणू येथे क्रेडो वर्ल्ड स्कूल च्या वतीने नुकतेच रंग आणि उत्सवाच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष अनुज अग्रवाल, दिपेश कनोडीया आणि मुख्याध्यापक निश्चल नायर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संचालक मीहिर शाह आणि सौ. हेमाली शाह यांच्याद्वारे करण्यात आले, त्यांच्या मार्गदर्शन आणि मेहनत यामुळे कार्निव्हलला यशस्वी बनवण्या मदत झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक निश्चल नायर यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना यशाची शुभेच्छा दिली.
संपूर्ण कार्निव्हल उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांचे नृत्य, संगीत आणि रंगमंचावरील अभिनय कार्यक्रम सादर केले. त्यात मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे ’खाद्य स्टॉल्स’. या स्टॉल्समध्ये विविध प्रकारच्या पदार्थांची चव घेण्यात आली व सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. विविध ठिकाणांहून आलेले विविध वेशभूषाधारी कलाकार आणि त्यांचे आकर्षक प्रदर्शन, एकत्रितपणे सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारं होतं. विद्यार्थ्यांची उत्साही भागीदारी आणि कलेची विविधता सर्वांना आनंद देणारी होती.
यंदाच्या कार्निव्हलने शालेय जीवनातील आनंद, समन्वय आणि सहकार्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. सर्व विद्यार्थ्यांना या रंगीबेरंगी उत्सवाचा अनुभव घेतला, आणि शालेय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच इतर विविध कला क्षेत्रांत भाग घेणं ही एक आनंददायक संधी मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *