दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आपण विविध पद्धतीने साजरा करत असतो. परंतु इतरांना मिळणारा आनंद यामध्येच सणाची खरी मौज असते. यश एंटरप्राईजेस जुहू यांच्या वतीने अशीच एक आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. पाड्यावरील मुलांना खाऊ देऊन दिवाळी साजरा करण्यासाठी संस्थेने एक अभिनय कार्यक्रम राबवला गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आणि त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एक उत्तम प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आले देवाने सर्वच दिलेले नाही पण आपल्याला जे दिले ते अति उत्तम दिले फक्त त्याचा गर्व करायचा नाही. अशा विचारांची मंडळी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरिबांची दिवाळी आनंदीपणे साजरा करण्याचा उत्तम प्रयत्न यश इंटरप्राईजेस च्या वतीने डहाणू येथे नुकताच पार पाडण्यात आला.
|
|

