भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

Daily News

भारतीय जनता पक्षाचे वतीने डहाणू परलाईन हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सदर पत्रकार परिषदेसाठी पालघर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकारांना संबोधित केले. भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपूत, ज्येष्ठ नेते बाबा काठोळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाला देशामध्ये आलेल्या यशाबद्दल सर्वप्रथम डॉक्टर हेमंत सवरा साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये गौरवोद्गार काढले. यानंतर त्याने विविध योजनांची माहिती सांगितली. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म नोंदणी ऑनलाईन भरण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याचा लाभ राज्यातील बहुतांश महिलांना होणार आहे आणि त्याला उत्कृष्ट आणि भरघोस असा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना अंतर्गत 7.5 एचपी पर्यंतचे पंप असणाऱ्या शेतकऱ्यांची कृषी पंप वीज बिलं
माफ करण्यात येणार आहेत. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत राज्यातील तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण घेऊन नोकरी आणि व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाणार आहे आणि संबंधित युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.याची माहिती दिली.
मुख्यमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत गृहिणींसाठी पाच पैकी तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत.
उच्च शिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या शिक्षणाचा येणारा खर्च याच्यापुढे राज्य शासन उचलणार आहे.
विकासात्मक कामासाठी भारतीय जनता पक्ष सदैव प्रयत्नशील राहणार असून देशाच्या आणि राज्यांच्या विकासासाठी भरघोस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये संबोधित केले. यानंतर त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आणि पत्रकार परिषदेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *