फक्त वार्षिक वर्गणी 100 रुपये भरा आणि महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मासिक घरपोच मिळवा

Daily News
पालघर दि  ३१  : महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मुखपत्रास ७५ वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. लोकराज्य हे मराठी मासिक राज्य शासनाकडून दरमहा प्रसिद्ध करण्यात येते.या मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रुपये असून लोकराज्य मासिक घरपोच मिळणार आहे. या मासिकात शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासन निर्णय, प्रासंगिक मान्यवर तज्ञाचे लेख तसेच महाराष्ट्राची संस्कृती, ऐतिहासिक, भौगोलिक, शैक्षणिक, शेती, उद्योग, आरोग्य विषयक, रोजगार व स्वयंरोजगारच्या विविध योजना आदि माहिती अचूक प्रसिद्ध करण्यात येते शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात लोकराज्य मासिकाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *