चिंचणी येथील एम. के. ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘सखी सावित्री ‘ अंतर्गत महिला सक्षमीकरण समितीतर्फे कार्यक्रम संपन्न

Daily News
​चिंचणी-
चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी संचालित एम. के. ज्युनिअर कॉलेज, चिंचणी येथे गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘आयव्हीपी स्मार्ट रूम’मध्ये सखी सावित्री अंतर्गत विशेष महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
​कार्यक्रमासाठी बोईसर येथील आनंद जनरल हॉस्पिटलच्या डॉ. विद्या संगारे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे विद्यार्थिनींना भेडसावणारी ‘पीसीओडी’ समस्या आणि किशोरावस्थेतील मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले. निरोगी आयुष्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी पटवून दिले.
​याप्रसंगी सी.टी.ई.ए च्या कार्यकारिणी सदस्या डॉ. रमिलाबेन श्रॉफ यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. दैनंदिन जीवनात सकस आणि संतुलित आहाराचे काय महत्त्व आहे, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. या कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या संगीता चुरी आणि श्री पी. एल. श्रॉफ कॉलेजच्या ‘आयक्यूएसी’ समन्वयक डॉ. चित्रा आष्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री पी. एल. श्रॉफ कॉलेजच्या महिला विकास कक्षाच्या विद्यार्थिनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुचिरा राऊत यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व सूत्रबद्ध संयोजन प्रा. चारुशीला बहारे यांनी केले.
​या प्रसंगी प्रा. मेघा पाटील, प्रा.अंजना निरगिडे, प्रा.संजय बहारे, ग्रंथपाल वर्षा चुरी आणि प्रा.भक्ती दवणे यांच्यासह महाविद्यालयातील १५० हून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा निरोप आभार प्रदर्शनाने घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *