सुरत येथे आरोपी  चिराग गोटीची  पोलिसांनी काढली धिंड, नागरिकांनी  पोलिसांचे आभार मानून फुलांचा वर्षाव केला!

सुरत येथे आरोपी  चिराग गोटीची  पोलिसांनी काढली धिंड, नागरिकांनी  पोलिसांचे आभार मानून फुलांचा वर्षाव केला!

Daily News
सुरत शहरात एक मोठा प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये चिराग गोटी नामक आरोपीला पोलिसांनी पकडून त्यावर धिंड काढली आहे.
गोटी हा एक वादग्रस्त व्यक्ती असून, त्याच्यावर व्याज पैशांचे व्यवहार करून लोकांना त्रास देण्याचे आरोप होते. त्याच्या अवैध धंद्यामुळे शहरात त्याने अनेकांना शोषित केले होते.
आरोपी चिराग गोटीवर काही लोकांना मारहाण करून त्यांच्यावर नाहक त्रास देण्याचे आरोप आहेत. त्याच्या बाबतीत पोलिसांनी कडक कारवाई केली आणि त्याला अटक करुन धिंड काढण्यात आ़ली . हे दृश्य पाहण्यासाठी सुरतच्या रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. चिराग गोटीचा जिथे दबदबा होता त्या रस्त्यावर पोलिसांनी त्याची धिंड काढली, यावेळी तो फाटलेल्या कपड्यांत वावरताना दिसला.
पोलिसांची ही कडक कारवाई शहरवासीयांसाठी आनंदाचा क्षण ठरला. सुरतवासीयांनी पोलिसांचे आभार मानले आणि रस्त्यावर फुलांचा वर्षाव केला. लोकांच्या या प्रतिसादामुळे पोलिसांमध्ये एक अभूतपूर्व आनंद आणि समाधान दिसून आले.
सुरत पोलिसांनी असा संदेश दिला आहे की, त्यांच्या शहरात अशा प्रकारची अनैतिक आणि गुन्हेगारी ,अवैध धंदे सहन केले जाणार नाहीत, आणि त्यांनी असे इतर आरोपींना देखील कडक कारवाई करू अशी  चेतावणी दिली आहे.
ही कारवाई सुरत पोलिसांच्या प्रतिबद्धतेचे एक उदाहरण ठरली आहे, ज्यामुळे नागरिकांचा  पोलिसांवरचा विश्वास  अजूनच दृढ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *