आदिवासी प्रगती मंडळ आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धा

Daily News

आदिवासी प्रगती मंडळ आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धा कॉम्रेड शामराव परुळेकर यांच्या स्मृतीदिना निमित्त दरवर्षी आदिवासी प्रगती मंडळ संस्थेच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते . स्पर्धेचे अकरावे वर्ष असून यावर्षी जवळपास 400 विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात माकपाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी संस्थेचे सचिव रुपेश राणे, नगराध्यक्ष कॉम्रेड सुरेश भोये,उपसभापती कॉम्रेड नंदू हडाळ, संस्थेचे संचालक व गोदावरी परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, संचालक व प्राचार्य संदिप वावरे, संचालक व नगरसेवक सुहास सुरती, सहसचिव विजय खुलात व सर्व शाखांचे प्रमुख तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्पर्धेचे उत्तम आयोजन करण्यासाठी मेहनत घेतली. यावेळी प्रत्येक गटातील पाच विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तलासारी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे मुलाचे सहकार्य मिळाले. या स्पर्धेत काही मुलींना त्रास झाला त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचार देऊन बरे केले. रुग्णालयाच्या सहकार्याबद्दल प्राचार्य राजपूत यांनी रुग्णालयाचे डॉक्टर व त्यांच्या समूहाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *