डहाणू दि.२४ : भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या संपूर्ण स्वछ भारत करण्याच्या ध्येयाची पूर्तता होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालयीन विध्यार्थी, शिक्षक तसेच विविध संघटना, स्वयंसेवी संस्था ह्या मोहिमेस गती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील आपल्या एका भाषणात आमच्या भारतात प्लास्टिक (पॉलिथिन) पिशवी समूळ नष्ट करण्यासाठी जोर धरला आहे. आणि 'स्वछ भारत' करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार डहाणूतील आशागड येथील ए.सी.जी. कॅप्सूल कंपनीने राबविलेली स्वच्चतेची मोहीम कौतुकास्पद आहे. त्याचे कारण होते असोसिएशन ऑफ इंटर नॅशनल कोस्टल क्लिप अप डे चे! त्यासाठी डहाणूतील आशागड येथील ए.सी.जी. कॅप्सूल कंपनीचे प्रकल्प प्रमुख झाहीद शुक्रो तसेच एस.डि.एम. व आय.ए.एस.कटियार यांनी पुढाकार घेऊन डहाणूतील विविध शाळांतील विध्यार्थी-शिक्षक  तसेच कोर्डीनिएशन इंडियन (भारतीय) कॉसगार्ड (सी.आय.एस.एफ) चे अधिकारी व जवानांना सोबत घेऊन कोस्टल क्लीनअप डे साजरा करण्यासाठी डहाणूत येऊन डहाणूचा संपूर्ण किनारा स्वच्छ करण्यात आले. तत्पूर्वी कॅप्सूल कंपनीचे व कोस्टल अधिकाऱ्यांचे विध्यार्थ्यांनी स्वागत केले.